महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ (रजि नं. ई. ३९४ एन. )

                महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ ही राज्यातील कलाध्यापकांची एकमेव राज्य संघटना असून हिचा जन्म सन १९६२ साली झाला असून नागपूर शहरातील अनेक कलाशिक्षकांच्या साक्षीने दि.२०//१९६६ मा.धर्मदाय आयुक्त कार्यालय, तत्कालिन अध्यक्ष मा.प्रा.गोविंद अमृत पुराणिक, चिटणीस मा.श्री. . धुं. बापट, कोषाध्यक्ष मा.श्री.दे.मो. दवंडे, सहचिटणीस श्री.ना..डिखोळे नागपूर येथे संघटनेचे यांची नावे प्रमुखपदी नोंदणीकृत झाली. यावर्षी संघटनेने ६० वर्षात पदार्पण केलेले असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्यात महामंडळाद्वारे विद्यार्थी व कलाशिक्षकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. यात प्रमुख कलारंग व कलाहर्ष राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, कलाशिबिरे, चित्रप्रदर्शने, कार्यशाळा इ. उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्यात मुख्य समारंभातून उपक्रमशील कलाशिक्षकांचा सत्कार, उल्लेखनीय कार्यासाठी विद्यार्थ्यांचा गौरवसुद्धा करण्यात आला.

                 संघटनेचे बीज नागपूर शहरात पेरल्यानंतर रोपटे वाढवून तिचा वटवृक्ष कसा तयार होईल यासाठी तत्कालिन सर्व माजी अध्यक्ष व संघटना पदाधिकारी यांनी आपल्या अथक परिश्रमातून दिनांक २ जुलै १९९३ साली महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे संघटनेला शासनमान्यता मिळवून अनुदानित करवून घेतली. यानंतर संघटनेला सुगीचे दिवस प्राप्त झाले व संघटना गगनभरारी घेऊ लागली. माजी सर्व राज्याध्यक्ष (संग्रहीत माहितीनुसार) मा.श्री.एम.एस. गोसावी, मा.श्री.गो.अ.पुराणिक, मा.श्री.चि.लेले, श्री.प्रभाकर शुक्ल, मा. श्री. व्ही. पी. पाटील, मा. श्री. शामकांत जाधव, मा.श्री. चंद्रकांत जोशी, मा. श्री. अ. दा. अळसुंदेकर, मा.श्री.गिरीष सहदेव, मा.श्री. मल्लिकार्जुन सिंदगी, मा. श्री. सुभाष पाटील, मा. श्री. पी. आर पाटील यांनी वाढविलेले महावटवृक्षांचे संगोपन करुन कलाविषयाला न्याय व कलाशिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व कार्यरत पदाधिकारी व राज्यातील सर्व जिल्ह्यातील संघटना पदाधिकारी यांनी या महावटवृक्षाला अबाधित ठेवण्यासाठी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे हे कदापिही विसरुन चालणार नाही.

                 मी सन १९९८ पासून संघटनेचे कार्य करीत आहे. व संघटनेशी एकनिष्ठ राहून महामंडळाचे राज्य सल्लागार मा.श्री.पी.आर.पाटील, मा.श्री.दादा भगाटे, मा.श्री.एम. कादरी, मा.श्री. हिरामण पाटील यांचे मार्गदर्शन व माझे सहकारी श्री. बलराम सामंत, श्री. दिगंबर बेंडाळे, श्री.विजयसिंह ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, महिला आघाडीच्या श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, सौ. ज्योत्स्ना पाटील व राज्य कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी तसेच विभागीय उपाध्यक्ष सहकार्यवाह, सर्व प्रसिद्ध प्रमुख यांच्या सहकार्याने हा जगन्नाथाचा रथ आम्ही सर्व मिळून पुढे नेत असताना आज महाराष्ट्रामध्ये ३६ जिल्हे आहेत व ३६ जिल्हा शाखा कार्यरत आहेत. हे केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच सर्व शक्य होत आहे. आज कलाशिक्षकांसमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील तमाम कलाशिक्षकांची एकजूट अत्यंत महत्त्वाचे आहे. एकजूटतेशिवाय समस्या सोडविणे हे अशक्य आहे.

                शासनस्तरावर अनेक निर्णय कलाविषयासाठी घातक घेतल्या जात आहेत. याकरिता आपल्याला एकजुटीने आपली प्रभावी बाजू मांडून प्रश्न सोडवायचे आहे. त्याकरिता आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. महामंडळाच्या माध्यमातून लढा सुरू आहे. यासाठी आपण राज्य व जिल्हास्तरावर संघटीत राहून शासन निर्णय बदलवू शकतो असा माझा दृढ विश्वास आहे.

                 महाराष्ट्रात कला शिक्षकांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी, कला विचारांचे आदान-प्रदान व्हावे याकरिता राज्यस्तरीय कला शिक्षण परिषद, जिल्हास्तरीय कृतिसत्रे (कार्यशाळा) महामंडळाच्या वतीने जिल्हा संघ राबवित असतात परंतु खेदाने सांगावे लागते की अशावेळी बरेचसे कलाशिक्षक या कार्यक्रमांना अनुपस्थित राहतात अशा वेळी कला विषयातील नवीन प्रवाह, नवे विचार, नव्या संकल्पना, नवी दृष्टी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यापासून ते वंचित राहतात. अशा कार्यक्रमात आपणही सहभागी होऊन इतरांनाही सहभागी होण्यास सांगितले पाहिजे.

Scroll to Top